आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकधीकाही थुईथुई नाचणारे कारंजा चौकातील पाणी आटले अन् पुन्हा कधी कधी सुरू झाले. पण लक्षात राहत होती ती कारंजा चौकातील स्त्री व बाळाचे शिल्पच. या शिल्पाला अखेर पालिकेच्या सौंदर्यीकरणाची नजर लागली अन् ते शिल्प अखेर आज काढण्यात आले. या जागी आता पालिकेने कितीही सौंदर्याची भर घातली तरी त्या शिल्पाची भर लागणार नाही. फक्त पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र समाधान मिळणार आहे. बुलडाण्यात नव्हे तर जिल्हाभरातील लोक या कारंजा चौकात समाधानाने त्या शिल्पाकडे बघत होते.
१८९३ साली बुलडाणा नगर पालिका अस्तित्वात आली. आज या पालिकेला १३९ वर्ष होत आहे. दरम्यान नगराध्यक्षपदी स्व. गुप्ता हे असतांना खामगाव येथील पंथे गुरुजी यांनी बनवलेले हे स्त्री व बाळाचे शिल्प कारंजा चौकात बसविण्यात आले व या चौकाला कारंजा चौक असे नावही पडले. या कारंजा चौकातील अनेक जुन्या स्मृती या आता नष्ट झाल्या आहेत. मात्र त्या खासगी मालमत्ता होत्या. व्यास बालोद्यानाच्या जागी बसेस उभ्या राहत होत्या. ज्या फक्त सायंकाळपर्यंतच मलकापूर कडे जात होत्या. गर्दे वाचनालय हे आजही तेथेच ऊभे आहे. या भागातच स्व. आत्मारामजी पांडे तत्कालीन पत्रकार यांचेही वास्तव्य होते. अशा अनेक आठवणी येथील नष्ट होत आहे. या भागात शासकीय इमारती अजुन टिकुन आहे.
पोलिस कवायत मैदानाजवळील सुरक्षा व्यवस्थेचा दारुगोळा भांडार अजुन आहे. जुनी चर्च अजुन आहे. न्यायालयाची शंभरी ओलांडलेली इमारत अजुन आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद शाळेची दगडी इमारत या वास्तू अजुनही तत्कालीन काळाची ओळख पटवून देत आहेत. कारंजा चौकावर पालिकेने नजर का लावावी, हा प्रश्न मात्र सध्या बुलडाणेकरांच्या मनाला खोलवर जखम केली आहे. बुलडाणेकरांची ही एक आठवणच कायमस्वरुपी मोडीत काढणाऱ्या पालिकेबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
फेब्रुवारी महिन्यात केली होती रंगरंगोटी
१३ फेब्रुवारी २०२२ रोजी या कारंजा चौकातील स्त्री व बाळाच्या शिल्पाला रंगरंगोटी करण्यात आली होती. या शिल्पाजवळ असलेल्या कारंजांतुनही पाणी उडायला लागले होते. त्याचे दृश्यही रात्री अप्रतिम दिसायला लागले होते. नवरात्रोत्सवात तर हा चौक उजळून निघत होता. आता मात्र कितीही सौंदर्यात भर घातली तरी त्यात या शिल्पाच्या सौदर्याएवढी सर नसणार आहे. फक्त पैसा मात्र खर्च होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.