आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाख रुपये लंपास केल्याची घटना:शिक्षकाला लुटणाऱ्या चोरट्या महिलेच्या दोन साथीदार महिलांचाही शोध सुरू

मेहकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भारतीय स्टेट बँकेत कर्ज खात्यात पैसे भरण्यासाठी गेलेल्या शिक्षक विवेक नागरिक यांच्या पिशवीला ब्लेड मारून त्यातून एक लाख रुपये लंपास केल्याची घटना २६ जुलै रोजी घडली होती. परंतु ही घटना विवेक नागरिक यांच्या लक्षात आल्याने मध्य प्रदेश येथील आरोपी महिला पकडल्या गेली होती. मात्र चोरी करताना तिच्या सोबत असलेल्या दोन महिला फरार झाल्या होत्या. या महिलांचा पोलिस घेत आहेत.

येथील भारतीय स्टेट बँक शाखेत २६ जुलै रोजी अकरा वाजेच्या सुमारास शिक्षक विवेक नागरिक हे कर्जाचे पैसे भरण्यासाठी गेले होते. त्यांच्या पाठीमागे उभी असलेल्या प्रियंका सिसोदिया वय २७ या महिलेने विवेक नागरिक यांच्या हातातील पिशवीला ब्लेड मारून त्यातील १ लाख रुपये काढून घेतले होते. ही घटना लक्षात आल्याने चोरटी महिला पकडल्या गेली. त्या महिलेने दिलेल्या माहिती व सीसीटीव्ही फुटेज नुसार महिलेच्या सोबत दोन महिला होत्या. त्या महिला बँकेच्या बाहेर लक्ष ठेवण्याचे काम करीत होत्या. आरोपी महिलेची जाऊ मीनाक्षी कुंदन सिसोदिया वय ३५, व आरोपी महिलेची वहिनी मनीषा राका सिसोदिया वय ३० रा कडीया ता. पाचौर जिल्हा राजगड, मध्य प्रदेश या दोन्ही महिला फरार आहेत त्यांच्या पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, २७ जुलै रोजी पोलिसांनी आरोपी महिला प्रियंका सिसोदिया हिस न्यायालयात हजर केले असता आरोपी महिलेला २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...