आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायी दिंडी:श्रींच्या जयघोषाने रजत नगरी दुमदुमली ; हजारो भाविक भक्तांनी घेतले पालखीचे दर्शन

खामगाव / गिरीश पळसोदकर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा या अभंगातील ओळीची प्रचिती शेगावला परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या पालखीतून पहावयास मिळाली. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पायी दिंडीचे व पालखीचे आगमनाने २ ऑगस्ट रोजी रजत नगरीतील जनतेने अनुभवली. विठ्ठल नामाचा व गजाननाच्या जय जयकाराने व टाळमृदंगाच्या गजराने रजतनगरी दुमदुमून गेली होती. पालखीच्या स्वागतासाठी शहरातील नगर परिक्रमावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी श्री ची प्रतिमा ठेवून भव्य आरास करण्यात आली होती. ही आरास डोळ्याचे पारणे फोडणारी होती.

श्री च्या पालखीचे रजत नगरीच्या सिमेवर सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आगमन होताच भक्तांकडून स्वागत करण्यात आले. यानंतर ही पालखी अकोला रोडवरील हनुमान व्हिटॅमिन कारखान्याच्या आवारात आली. तेथे पालखीचे साकेत प्रेम सराफ यांनी सपत्नीक पूजन केले. तेथे काल्याचे किर्तन पार पडले. पालखीतील वारकऱ्यांना सराफ परिवाराचे वतीने स्वागत करण्यात आले. भोजनानंतर पालखी शहराकडे मार्गक्रमण केले. पालखी श्री वाल्मीकी चौक, विकमसी चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती समाेरुन टिळक चौक, अर्जुन जलमंदिर समोरुन, मेनरोड, जगदंबा चौक, मोहन चौक, फरशी महावीर भवन, खामगाव अर्बन बँक समोरुन नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात पोहोचली तेथे रात्री पालखीचा मुक्काम होत.

मुक्कामाच्या ठिकाणी शहरातील व ग्रामीण भागातील लोकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. ही पालखी शहरातून मार्गक्रमण करीत असतांना काही ठिकाणी या पालखीवर पुष्पवृष्टी, आतषबाजी करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी गेली होती. पालखीच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात व पालखी सोबत तगडा पोलिस बंदोबस्त होता.

बातम्या आणखी आहेत...