आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्य जीव सोयरेंची मागणी:वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून नागाला वगळण्यात येऊ नये

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून नागाला वगळण्यात येऊ नये, अशी मागणी वन्यजीव सोयरेंच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे २९ जुलै रोजी करण्यात आली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून नाग वगळण्यात यावा, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत तसेच केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. परंतु नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असून निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा हे गाव संपूर्ण जगात नाग पंचमी सणादिवशी जिवंत नाग पूजेसाठी प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्याच्या पंचमीला शिराळा गावात जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा महायोगी श्री शिव गोरक्षनाथ महाराजांनी ९०० शतका पासून सुरू केली आहे. ही परंपरा सन २००२ पर्यंत सुरू होती. परंतु भारतीय वन्यजीव कायदा १९७२ नुसार ही परंपरा न्यायालयाने बंद केली आहे. त्यामुळे नागाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून नागास वगळण्यात येऊ नये, अशी मागणी वन्यजीव सोयरेंचे प्रकाश डब्बे, गणेश श्रीवास्तव, किरण देशपांडे, प्रशांत राऊत, श्रीकांत पैठणे, नितीन श्रीवास्तव यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...