आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबर धडक:भरधाव जाणाऱ्या कारची दुचाकीला जबर धडक; औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील घटना, दुचाकीस्वार फुटबॉल सारखा उडून कारमागे आदळला

डोणगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या कारने समोरून येत असलेल्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज ९ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास येथून काही अंतरावर असलेल्या वळणावर घडली. मेहकर वरुन एम एच २९ /बी सी /९६६२ या क्रमांकाची कार डोणगावकडे येत होती. तर नागपूर येथील संजय खिल्लारी हे एम एच २८ बी एफ ९५३७ या क्रमांकाच्या दुचाकीने डोणगाववरून नागपूरकडे जात होते. येथून काही अंतरावर असलेल्या वळण रस्त्यावर येताच त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव येणाऱ्या कारने जबर धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, या अपघातात दुचाकी स्वार हा फुटबॉल सारखा उडून कारच्या पाठीमागे जावून आदळला.

या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी दुचाकीस्वारास उपचारार्थ मेहकर येथे हलविले. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलिस ठाण्याचे सतीश मुळे, विकास राऊत, पवन गाभणे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. पुढील तपास डोणगाव पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...