आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाता:भरधाव वाहनाने तीन‎ वाहनांना दिली धडक‎

मलकापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या वाहनांवरील‎ नियंत्रण सुटल्यामुळे वाहन‎ चालकाने एकापाठोपाठ तीन‎ वाहनांना धडक दिली. या‎ अपघातात तीन जण जखमी झाले‎ असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर‎ नुकसान झाले आहे. ही घटना २‎ फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजेच्या‎ सुमारास घडली. झालेल्या‎ अपघाताची माहिती परिसरात‎ पसरतात एकच खळबळ उडाली.‎

तालुक्यातील दाताळा येथील‎ रोहन संजय पाटील हा युवक‎ आपल्या मालकीच्या एमएच २८/‎ डीक्यू/ ४२२६ या क्रमांकाच्या‎ वाहनाने बुलडाणा रोडने घरी जात‎ होता. अचानक त्याचा‎ वाहनावरील ताबा सुटल्यामुळे‎ त्याने एका पाठोपाठ दुचाकी,‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ऑटो रिक्षा व चारचाकी अशा तीन‎ वाहनांना धडक दिली. या‎ अपघातग्रस्त वाहनातील चालक‎ गंभीररीत्या जखमी झाले असून‎ त्यांच्यावर खासगी व उपजिल्हा‎ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.‎ घटनेची माहिती मिळताच शहर‎ पोलिसांनी घटनास्थळ दाखवून‎ दाखल होऊन वाहन चालकास‎ ताब्यात घेतले आहे. सुदैवाने या‎ अपघातात कोणतीही जीवित हानी‎ झालेली नाही.‎

बातम्या आणखी आहेत...