आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी:खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपला वाटा उचलावा

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणारा इंग्रज काळापासून प्रलंबित असलेला जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपला वाटा उचलावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्यक्षात भेटून एका निवेदनाद्वारे केली.

मुंबईतील नंदनवन शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा खा. प्रतापराव जाधव यांनी भेट घेऊन जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणाऱ्या प्रकल्प संदर्भात चर्चा केली. यामध्ये केंद्र २०१६ च्या अर्थसंकल्पामध्ये पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत खामगाव जालना रेल्वे मार्गाला मान्यता देण्यात आली. मे २०२२ मध्ये या रेल्वेमार्गाचे हवाई सर्वेक्षण रेल्वे विभागाच्या वतीने पूर्ण झाले असून आता जागा उपलब्धता व भूमी अधिग्रहण संदर्भात पुढील कारवाई अधिक गतीने करावी. या रेल्वे मार्गासाठी ५० टक्के वाटा हा राज्य सरकारला उचलावा लागणार आहे राज्य शासनाने या रेल्वे मार्गासाठीचा आपला वाटा दिला तर खामगाव जालना या रेल्वे मार्गाचा काम तात्काळ सुरू होईल. या रेल्वे मार्गाचे काम त्वरेने झाल्यास दक्षिण मध्य रेल्वे व मध्य ‍ रेल्वे जोडले जाणार आहे. त्याचा फायदा नागरिकांसह शेतकरी, व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात होणार आहे.

अकोला अकोट खांडवा हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यामधून जाणार आहे. या मार्गालाही केंद्र सरकारने मंजुरात दिली असून११ जुन रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिव येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये गृह विभागाने द. वेस्टर्न झोन कौन्सिल मध्ये ह्या नविन रेल्वे मार्गाला मान्यता दिली आहे. हा मार्ग पूर्णत्वास जाण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ जमीन उपलब्ध करून द्यावी व भूमी अधिग्रहणाची कारवाई त्वरेने पूर्ण करावी अशी मागणी सुध्दा खा. जाधव यांनी केली आहे. बुलडाणा मंजुर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामालाही गती देण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ.संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, माजी.आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, शांताराम दाणे, बळिराम मापारी उपस्थित होते.

वैनगंगा, नळगंगा व पैनगंगा सर्वेक्षण करा
केंद्र सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा या नदीजोड प्रकल्पांसाठीचे वैनगंगा ते नळगंगा या प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. परंतु खामगाव ते पेनटाकळी हे साधारण ४७ किलोमीटरचे सर्वेक्षण होणे अजून बाकी आहे. ते सर्वेक्षण तात्काळ करून प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात निधी उपलब्ध करून द्यावा या विस्तार होणे गरजेचे आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर होणार असून शेतकऱ्यांनाही मुबलक पाणी मिळणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास कारणीभूत ठरणार प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आत्महत्या कमी होतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...