आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण क्षेत्र:राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराला "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ नाव

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार असे नाव देण्याचा शासन निर्णय निघाला आहे. या निर्णयाचे डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले. ही मागणी परिषदेनेच केली होती. त्याला यश आल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्य शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. परंतु सदरील पुरस्काराला आजपर्यंत कोणतेही नाव नव्हते. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने मागील पाच वर्षांपासून राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्काराला महाराष्ट्रच नव्हे, तर भारत देशात बहुजनांना शिक्षण मिळावे. यासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या फुले दाम्पत्याचे नाव देऊन त्यांच्या महान कार्याचा गौरव करावा. यासाठी शासन दरबारी लढा दिला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना वारंवार निवेदने दिली. त्यामुळे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हे नाव देणेच योग्य राहील, ही डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेची मागणी मान्य झाली असून महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय काढून राज्य शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराला आता "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार" हे नाव दिले आहे. सदरील शासन निर्णयाचे परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर, प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मण नेव्हल, प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळंके, महासचिव सतीश काळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत खाचणे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, सुभाष इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष विजयसिंग राठोड, विजय पाटील, राजेंद्र भुतेकर, विजय नारखेडे, समाधान तायडे व शिक्षक परिषदेचे बुलडाणा जिल्हा पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...