आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वान:मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला; महिनाभरात 173 जणांना चावा

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस मोकाट श्वानांचा त्रास वाढत चालला असून टोळक्याने फिरणारे हे श्वान प्रसंगी वृध्द व बालकांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या १७३ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात इंजेक्शने टोचण्यात आली आहे. या श्वानांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे या मोकाट श्वानांना आवर कोण घालणार, असा प्रश्न चर्चिल्या जात आहे. एखादेवेळी जर सरकारी इस्पितळात इंजेक्शन उपलब्ध नसेल तर औरंगाबाद येथेही जाण्याची तयारी श्वानाने चावा घेतलेल्या व्यक्तिला ठेवावी लागते.

जिल्हा मुख्यालयी असलेल्या शासकीय कार्यालयांसह विविध चौकात व गल्लीबोळात सध्या कुत्रे टोळक्याने फिरत आहे. हे कुत्रे ग्रामीण भागातही हल्ले करत आहेत. २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत श्वान चावल्यामुळे ११ व्यक्तींसह लहान बालकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात इंजेक्शन देण्यात आले आहेत. बुलडाणा शहरातच तीन लहान मुलांवर श्वानांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. शहरातील इंदिरा नगर भागातही श्वान चावल्याची घटना घडली होती. चिखली तालुक्यातही या घटना घडत आहेत. वळती गावातील एका आठ वर्षीय बालकावर श्वानाने हल्ला केला होता. अशा घटना घडत असतांना स्थानिक पालिका प्रशासनाकडून यावर कोणताही ऊपाय शोधल्या जात नाही. या मोकाट श्वानांना पकडुन जंगलात सोडण्याचे काम केले जात नाही. निर्बीजीकरणाकडेही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हा प्रश्न आजचा आहे असे नव्हे तर गेल्या कित्येक वर्षापासुनचा आहे. मोकाट श्वान हे पिसाळलेले नसले तरी हिंसक होत असल्याचे दिसत आहे.

शिकवणी वर्गाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची दहशत
बहुतांश शिकवणी वर्ग हे सकाळी किंवा सायंकाळी भरत असतात. यावेळी विद्यार्थी आपली सायकल घेऊन शिकवणी वर्गांना जातात. दरम्यान मोकाट श्वान या विद्यार्थ्यांच्या अंगावर धाऊन जात असल्याचे प्रकार दररोज घडत आहे. अशा प्रसंगी विद्यार्थी भेदरलेले असतात किंवा त्यांचा अपघात तरी झालेला असतो. वेळ सकाळची असल्याने रहदारी कमी असते. तर सायंकाळी बहुतांश लोक घरी आलेले असतात. तेव्हा या श्वानांपासून संरक्षण करणार कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...