आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाम:अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणामुळे पातुर्ड्याचा पाणी प्रश्न पेटला; संगीतराव भोंगळ निर्णयावर ठाम

संग्रामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पातुर्डा येथील पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. दरम्यान, आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणस्थळी मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देवुन या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तर हे उपोषण मागे घ्यावे,अशा आशयाचे पत्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. मात्र उपोषणकर्ते संगीतराव भोंगळ यांनी भूमिकेवर ठाम राहत न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे अधिकाऱ्यां समोर स्पष्ट केले. त्यामुळे हा पाणीबाणीचा लढा आता अधिक लक्षवेधी ठरला आहे. त्यामुळे हे आंदोलन व्यापक रुप घेत असल्याचे दिसून येत आहे.

संघर्षानंतर पातुर्डा गावासाठी पाणी पुरवठा योजना मंजुर होवून २ कोटी ३१ लाख ८१ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला होता. निधी असताना देखील अधिकारी मंजूर योजनेचे काम न करता कामाची निविदा सोडत करण्यास विलंब करत आहेत. त्यामुळे जो पर्यंत निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही, तो पर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका संगीतराव भोंगळ यांनी घेतली आहे. उपोषणस्थळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, संघटना व गावकऱ्यांनी समर्थन देत पाठिंबा दिला आहे. आज बुधवारी तहसीलदार चव्हाण व महसूल विभागाचे कर्मचारी, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग खामगावचे उप अभियंता चव्हाण, शाखा अभियंता कोरडे यांनी भेट देवून योजनेचे काम सुरू करू, असे आश्वासन दिले.

हेकेखोर अधिकाऱ्यांमुळे योजनेचे काम रखडले
पातुर्डा गावासाठी भविष्यातील पन्नास वर्षाचा दुरदुष्टीकोण ठेवुन ही महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी तब्बल सहा वर्षे लढा दिला. आज रोजी गावातील जुनी पाइपलाइन व टाकी जीर्ण झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मुबलक व शुद्ध पाणी मिळत नाही. ही योजना पूर्णत्वास गेल्यास गावकऱ्यांना शुद्ध व मुबलक स्वरुपात पाणि मिळेल. ही मानसिकता ठेवुन हा लढा उभारल्या गेला. मात्र, मुजोर प्रशासनातील अधिकारी या योजनेकडे गांभीर्याने पाहत नाहीत. अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणामुळेच ही योजना रखडल्याचा आरोपी संगीतराव भोंगळ यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...