आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रणा सज्ज:ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

मोताळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून येथील तहसील कार्यालयाच्या हॉल मध्ये उद्या २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषीत करण्यात येणार आहे. मत मोजणीसाठी ५ टेबलवर जवळपास २३ कर्मचारी नियुक्त केल्याची माहिती मिळाली असून ३६ फेऱ्या होणार आहेत.

तालुक्यातील मुदत संपलेल्या ११ ग्रामपंचायत साठी काल १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये १५ हजार ९२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उद्याच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून येथील तहसील कार्यालयाच्या हॉल मध्ये मतमोजणी होऊन निकाल घोषीत करण्यात येणार आहे. यासाठी ५ टेबलवर ३६ फेऱ्यात ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

मतमोजणीसाठी २३ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये ५ निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ५ व १० सहाय्यक म्हणून तलाठी तसेच ३ मतमोजणी पर्यवेक्षक यांचा समावेश आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व अकरा ग्रामपंचायतची मतमोजणी होऊन निकाल घोषीत होण्याची शक्यता आहे. अशी माहिती निवडणूक सहाय्यक सतीश मुळे यांनी दिली आहे. निवडणूक अधिकारी तहसीलदार सारिका भगत, नायब तहसीलदार ईश्वर गिरी व कर्मचारी काम पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...