आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:जानेफळातील कृषी केंद्रांची तालुका कृषी अधिकाऱ्यांनी घेतली झाडाझडती

जानेफळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक दिव्य मराठीने १८ ऑगस्टच्या अंकात ‘शहरातील कृषी केंद्रातून विकली जाते बोगस किटक नाशक औषधी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशीत केले होते. या वृत्ताची दखल घेत शनिवार, २० ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शहरातील कृषी केंद्राची झाडाझडती घेत दुकानाची तपासणी केली.

प्रभारी तालुका कृषी अधिकारी व्ही.पी.सरोदे यांनी आज शनिवारी शहरातील अनेक कृषी केंद्राची पाहणी करून औषध साठा व बिलांची तपासणी केली. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जानेफळ येथील कृषी केंद्रांची तपासणी सुरू असून यामध्ये लवकरच सत्य काय ते बाहेर येईल, असे सांगून त्यांनी कृषी केंद्रावर उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना कीटकनाशक औषधे शक्यतोवर कंपनीची घ्यावी, पक्के बिले दिली तरच त्याची खरेदी करावी, यासह विविध बाबी त्यांनी शेतकऱ्यांना सांगीतल्या.

बातम्या आणखी आहेत...