आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील आठवडी बाजारातील कृषी सेवा केंद्रात ६ जून रोजी चोरी झाल्याची घटना घडली होती. यावेळी चोरट्यांनी ३ लाख ८० हजारांचा माल लंपास केला होता. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तपास करून १२ जून रोजी उशीरा एका आरोपीस जेरबंद केले आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून पोलिसांनी २ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला आहेे. दरम्यान, सोमवारी आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १६ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आठवडी बाजार ते बस स्थानक या मुख्य मार्गावर आठवडी बाजारात सुरेश हरिदास सदानी यांचे कृषी सेवा केंद्र नावाचे बियाण्यांचे दुकान आहे. ६ जून रोजी त्यांच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली होती. यावेळी चोरट्यांनी ३ लाख ८० हजार रुपयांचा बियाण्यांचा माल लंपास केला होता. या प्रकरणी तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्याकडे दिला होता. ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करून त्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील, पीएसआय अशोक रोकडे, पोहेकॉ नंदकिशोर धांडे, नापोका दीपक पवार, विजय पैठणे, रमेश नरोटे, पोकॉ श्रीकांत चिंचोले, गणेश बरडे यांचा समावेश होता. या पथकाने तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवत मलकापूर येथील सायकलपुरा भागातील शे. साबीर शे. अहेमद यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी त्याच्या ताब्यातून कापूस बियाणे, मका बियाणे, ज्वारी बियाणे व इतर बियाणे व गुन्ह्यात वापरलेले एम.एच. २८/ए.बी./ १०५४ या क्रमांकाचे वाहन असा २ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला. या कारवाईसाठी सायबर शाखेचे नापोका राजू आडवे यांनी तांत्रिक मदत केली. त्यांना मलकापूरच्या डीबी पथकाने सहकार्य केले आहे. यात आणखी चार आरोपींचा समावेश असल्याची माहिती असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील व विशेष पथक करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.