आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहनुमान जयंती दिनी बारा गाड्या गडकऱ्यांच्या माध्यमातून ओढण्याची दीड शतकांपासूनची परंपरा आजही कायम आहे. जेजुरी नंतर खामगावात बारा गाड्या ओढल्या जाण्याचा कार्यक्रम होत असतो हे विशेष! यंदा गुरुवार, दि.६ एप्रिल रोजी हनुमान जयंती दिनी सायंकाळी येथील जगदंबा चौक ते गौतम चौक परत जगदंबा पर्यत बारा गाड्या एकमेकांना बांधून गडकरी सागर भोसले, दिपक भोसले, विशाल जोगदंड, उमेश जाधव, नितीन जाधव, शंकर गुर्जीवाल, संभाजी दासतोडे, गंगाराम गर्जीवाल, विनोद बोराखडे, आकाश भाटकर, अक्षय सातपूते, माऊली परांडे, संकेश भटकर, सचिन मराठे यांनी या गाड्या ओढल्या.
बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी दिसून येत होती. दि.७ एप्रिल रोजी खंडोबा मंदीरात खंडोबाचा लग्न सोहळा त्यानंतर लंगर पार पडला. नऊ दिवस अगोदर मंदिरात घट बसविण्यात आला होता. भंडारा गडकऱ्यांना अडीच दिवसाआधी लावण्यात आली होती. याठिकाणी हनुमान जयंतीच्या दिवशी दि.६ एप्रिल रोजी यात्रा भरली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.