आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील सात आठ महिन्यांपासून सत्तेचा जो गैरवापर चालू आहे, तो तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहात. आज राज्यात गल्लीपासून दिल्ली पर्यंत भाजपची सत्ता आहे. परंतु हे काही नवीन नाही. यापूर्वी काँग्रेसची सुध्दा सत्ता देशात होती. दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता असताना आणि काँग्रेस तसेच शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वैमनस्य देखील जनतेस सर्वश्रृत होते. तसेच अनेक जण त्या काळात शिवसेनेतून बाहेर पडले. मात्र त्यातील एकही जण शिवसेनेच्या मुळावर उठला नव्हता, कोणीही शिवसेना संपवण्याची भाषा केली नाही. परंतु आज ज्यांच्या जिवावर मोठे झाले ते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे गद्दार फितूर होवून शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत.
शिवगर्जाना सप्ताहानिमित्त सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या विदर्भ दौऱ्यावर असून १ मार्च रोजी येथील गांधी चौकात सायंकाळी ५ वाजता त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्या शिवसैनिकांना संबोधित करत होत्या. यावेळी मंचावर जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, दत्ता पाटील, लोहबन्धे, वसंतराव भोजने, जालिंधर बुधवत, संतोष तायडे, अविनाश दळवी, दत्ता वाघमारे, रवि भोजने आशिष रहाटे, बंडू बोदडे, रवि महाले, विजय इंगळे, श्रीराम खेलदार यांच्यासह तेजेंद्रसिंह चौहाण, गणेश माने, अशोक हटकर, विशाखा सावंग, भीकुलाल जैन, सुभाष ठाकूर, गौतम गवई उपस्थित होते. पुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर व संजय गायकवाड यांच्या बद्दल बोलताना म्हणाल्या की, या तिघांना मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला खोक्यांच्या ओळखीशी जोडले असून, त्यांना जनता माफ करणार नाही.
सर्वसामान्यांना अनेक प्रश्न भेडसावत असताना हे चुन चुन के मारेंगेची भाषा करतात. तर खासदार म्हणतात महागाई कुठे वाढली खर्च वाढला आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या, भाजप व शिंदे सरकार सर्व निवडणुका पुढे लोटत असून त्यांना सरकार पडण्याची भीती आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी सज्ज रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सभेला जिल्हाभरातून शेकडो शिवसैनिक व खामगावकर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन रवि महाले यांनी तर आभार प्रदर्शन विजय इंगळे यानी केले. सभेसाठी धीरज कंठाले, संतोष सावंग, शंकर खराडे, विजू बोरडे, संतोष करे, आनंद चिंडाले यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.