आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवचन:जन्मदात्यांच्या सेवेतच खरा परमार्थ; दहिकर महाराज यांचे प्रतिपादन

संग्रामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी मुले आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची सेवा करतात, त्यांना कुठल्याच देवाची गरज पडत नाही. कारण आई वडील ही देवाचीच रूपे असुन त्यांच्या सेवेतच परमार्थ आहे, असे प्रतिपादन हभप गजानन महाराज दहिकर यांनी केले. येथील राम मंदिरात श्रीराम नवमी निमित्त रामायण कथेचे आयोजन करण्यात आले. त्या प्रसंगी हभप गजानन महाराज दहीकर यांनी व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित केले. ४ एप्रिल पासून या कथेला प्रारंभ करण्यात आला आहे. दहिकर महाराज पुढे म्हणाले की, मनुष्य जन्माला आल्यावर सोबत काहीही घेऊन येत नाही आणि जाताना सुद्धा काहीही घेऊन जात नाही. आज समाजात प्रत्येकाला संपत्तीचा, ताकदीचा गर्व होत चालला आहे. ज्यांच्याकडे सोन्याची लंका होती, त्या रावणाचा देखील शेवटी गर्वहरण झाला. आपण तर त्यांच्या तुलनेत खूप नगण्य आहोत.

यासाठी प्रत्येकाने जीवन जगत असताना नीतिमत्ता साफ ठेवून दुसऱ्याचे चांगले होण्याची भावना मनात रुजवणे गरजेचे आहे. शिवाय आज प्रयत्न न करता प्रत्येकाला फळाची अपेक्षा आहे; परंतु घाम गाळल्या शिवाय दाम मिळत नाही. त्याचप्रमाणे प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नाही. व्यसनाधीनतेमुळे अनेकांचे सुखी संसार देशोधडीला लागले आहेत. व्यसनाने माणसाचे जीवन खराब होत असून, घरातील वातावरण देखील खराब होत आहे. घरात सुख व समृद्धी नांदण्यासाठी व्यसनमुक्त जीवन जगणे गरजेचे आहे. आई वडिलांच्या सेवेतच परमार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. ही रामकथा ११ एप्रिल श्रीराम नवमी पर्यत चालणार आहे. या रामकथेमुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी रामकथा सायंकाळी हरिपाठ तर रात्री विविध कीर्तनकाराचे कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...