आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदळली:रस्त्यात उभ्या नादुरुस्त ट्रकवर दुचाकी आदळली ; डिडोळा फाट्यावरील घटना; 1 ठार, एक गंभीर

मोताळा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोताळा ते मलकापूर मार्गावरील डिडोळा फाट्याजवळ नादुरुस्त उभ्या ट्रकवर मागून भरधाव येणारी दुचाकी आदळली. या अपघातात दुचाकीवरील एक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना १२ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. बोराखेडी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १२ जून रोजी रात्री डिडोळा फाट्याजवळ एमएच २८/ बीबी/ १८६२ या क्रमांकाचा ट्रक नादुरुस्त झाला होता. ट्रक चालकाने ट्रकचे कोणतेही इंडिकेटर, रिफ्लेक्टर न लावता रस्त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही काळजी न घेता नादुरुस्त ट्रक रस्त्यावर उभा केला होता. रात्री साडेआठच्या सुमारास मलकापूरकडून मोताळ्याकडे येत असलेले दुचाकी चालक शे. मोबीन शे. सलीम यांना ट्रक दिसला नाही. त्यामुळे भरधाव दुचाकी ट्रकवर जावून आदळली. या अपघातात दुचाकीवरील शे. सलमान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक शे. मोबीन गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पीएसआय अनिल भुसारी यांनी सहकाऱ्यांसह धाव घेत नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी शे. मोबीन यांना रुग्णालयात हलवले. त्यानंतर पंचनामा करून घटनास्थळी मृत्यू झालेल्या शे. सलमान याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात हलवला. शे. नईम शे. सलीम यांनी बोराखेडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय अनिल भुसारी, पोकॉ सुनील थोरात हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...