आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान सोहळा:सुमन म्हात्रे, पूनम गाडेकर यांचे लसीकरणाचे कार्य गौरवास्पद

खामगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सामान्य रुग्णालयातील परिचारिका सुमन म्हात्रे व पूनम गाडेकर यांचे लसीकरणाचे कार्य गौरवपूर्ण असल्याचे प्रतिपादन समाजसेवी ऊर्मिला ठाकरे यांनी केले. येथील सामान्य रुग्णालयात कोरोना महामारीच्या काळात प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारे कार्य केले, अशा निवडक परिचारिका सुमन म्हात्रे व पूनम गाडेकर यांच्या कार्याचा सन्मान सोहळा अधिसेविका पार्वती बोरोकार व सहायक अधिसेविका सरला झोडपे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिक्षण विस्तार अधिकारी, साहित्यिक तथा समाजसेविका ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचारिका शीतल बावनकुळे यांनी केले. त्यानंतर ऊर्मिला ठाकरे यांनी पूनम गाडेकर व सुमन म्हात्रे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांचे कार्य अति उत्तम असल्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली व प्रशस्तीपत्रक देऊन अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांनी पार्वती बोरोकार, सरला झोडपे, सुमन म्हात्रे व पूनम गाडेकर यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. सूत्रसंचालन मनोज पानझाडे व नितीन इंगळे यांनी तर आभार अर्चना सोनोने यांनी केले. कार्यक्रमासाठी कर्मचारी, परिचारकांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...