आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंत कोसळली:सिंदखेडराजातील चांदणी तलावाची भिंत कोसळली

सिंदखेडराजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोळाव्या शतकात बांधकाम झालेल्या अनेक ऐतिहासिक वास्तू शहरात आहे. त्यामधील चांदणी तलावाची उत्तरेकडील दगडी पाळू असलेली भिंत अचानक कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे अखेरच्या घटका मोजणाऱ्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राजे लखोजीराव जाधव यांच्या काळात शहरात अनेक पाणवठे तयार करण्यात आले होते. यातील सर्वात मोठा मोती तलाव आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. दरम्यान,अत्यंत मनोहारी परिसर असलेल्या चांदणी तलावाची उत्तरेकडील भिंत कोसळल्याने ही ऐतिहासिक वास्तू आता धोक्यात आली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात जवळपास तेरा ऐतिहासिक वास्तू आहेत.त्यापैकी पुतळा बारव आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. चांदणी तलाव हा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असून याची देखभाल दुरुस्तीचे काम हे याच विभागाचे आहे. परंतु या विभागाच्या दुर्लक्षामुळे आज चांदणी तलावाची भिंत कोसळली आहे. हा तलाव पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे. शहरातील चांदणी तलावाची दगडी पाळूची कोसळलेली भिंत.

बातम्या आणखी आहेत...