आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महात्मा बसवेश्वर यांचे कार्य प्रेरणादायी; सरपंच लक्ष्मी म्हस्के यांचे प्रतिपादन

देऊळगावमही16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत महात्मा बसवेश्वर यांनी मरगळलेल्या समाजाला जागृत करण्याचे काम केले. तसेच त्यांनी ९०० वर्षापूर्वी आंतरजातीय विवाहासाठी समाजात पुढाकार घेऊन आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळवून देत पहिला आंतरजातीय विवाह समाजामध्ये त्यांच्या पुढाकारातून घडवला. त्यांचे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन सरपंच लक्ष्मी रामकिसन म्हस्के यांनी केले. येथील ग्रामपंचायत भवनमध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मी म्हस्के होत्या. तर रामकिसन म्हस्के, वसुदेव पाटील, विजय रिढे, आकाश पेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्त्रीयांना समान अधिकार द्या. पंचसूतके पाहू नका. दलितांना समान संधी द्या. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद करू नका. कोंबडे-बकरे कापू नका पुरोहिताच्या हस्ते देवपूजा करू नका. ज्योतिष, भविष्य, वास्तुशास्त्र, पंचांग पाहू नका.

यज्ञ, होम-हवन करु नका. प्रश्न उत्तर करा, चर्चा करा. वचन साहित्य द्या. शुभाशुभ पाहू नका. नदी-स्नान करू नका. एकमेकांच्या पाया पडू नका. संन्यास वादाचे उदात्तीकरण करू नका. सांसारिक जीवन जगा. अस्पृश्यता पाळू नका. माणसाला माणसाप्रमाणे वागवा. पशुहत्या व मांसाहार करू नका, व्यसनाधीन व चोरी करु नका. हत्या करु नका. रागावू नका. दया हाच धर्म आहे. सदाचाराने वागा. निती-नैतिकता आणि विवेकाने वागा असे विचार बसवेश्वर यांनी दिले. त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे आवाहन अभिजित शिंगणे यांनी केले. यावेळी धर्मराज खिल्लारे, मंगेश होमपारखे, गोपाल जिजोते, चेके पाटील, रंगनाथ शिंगणे, निठवे आप्पा, संतोष भुतेकर, पुष्पा शिंगणे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...