आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त:मोताळ्यातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे काम संथगतीने ; काम लवकर पूर्ण करण्याची मागणी

मोताळा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आठवडी बाजार ते बस स्थानक या मुख्य मार्गाच्या दुतर्फा नाल्यांचे काम हे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर काही ठिकाणी नाल्यांचे काम पूर्ण होऊनही नाल्यांच्या कडेला असलेले खड्डे न बुजल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नाल्यांच्या बांधकामावर पाण्याचा वापर कमी प्रमाणात होत असल्याने दुकानदार स्वता नाल्यांच्या बांधकामावर पाणी टाकताना दिसून येत आहे. या नाल्यांच्या बांधकामावर मुबलक प्रमाणात पाण्याचा वापर करून लवकर नाल्यांचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी शहरातील व्यावसायिक व नागरिक करत आहेत. मागील जवळपास अंदाजे सहा महिन्यांहून अधिक कालावधी पासून येथील आठवडी बाजार ते बस स्थानक या मुख्य मार्गाच्या दुतर्फा नाल्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. या मार्गावर काही ठिकाणी नाल्यांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणी अजूनही नाल्यांचे बांधकाम बाकी आहे. तसेच काही ठिकाणी नाल्यांच्या बांधकामासाठी नुसत्या नाल्या खोदून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला दुकान असलेले व्यावसायिक त्रस्त झाले आहे. ज्याठिकाणी नाल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, त्याठिकाणी पूर्ण झालेल्या नाल्यांच्या कडा भरण्यात आल्या नसल्याने नाल्या जवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्याला लागून असलेल्या दुकानात ग्राहकांना जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच ज्याठिकाणी नाल्यांचे काम सुरू आहे, त्या नाल्यांच्या बांधकामावर पाण्याचा अल्पप्रमाणात वापर करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी व्यावसायिक स्वता नाल्यांच्या बांधकामावर पाणी मारतांना दिसून येत आहे. त्यामुळे सुरू असलेल्या नाल्यांच्या बांधकामावर मुबलक पाण्याचा वापर करून बांधकाम पूर्ण झालेल्या नाल्यांच्या कडा लवकर भरण्यात याव्या तसेच बाकी असलेल्या नाल्याचे बांधकाम लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी येथील व्यावसायिक व नागरिक करत आहेत.

नालीच्या बांधकामाला गेले तडे ^येथील आठवडी बाजार ते बस स्थानक या मार्गावर सुरू असलेल्या नाली बांधकामावर पाण्याचा कमी वापर करण्यात आला आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सुरू असलेल्या नालीच्या बांधकामाला तडे गेल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी नाल्यांची उंची जास्त आहे तर काही ठिकाणी उंची कमी करण्यात आली आहे. यावरुन संबंधित विभागाचा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कामाकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. -गजानन बोदडे, सामाजिक कार्यकर्ता

बातम्या आणखी आहेत...