आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थशास्त्र विभागाची वाटचाल सुखकारक असून येणाऱ्या काळातही विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या अर्थशास्त्रीय ज्ञानात भर पडण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे असे मत प्राचार्य अविनाश मेश्राम यांनी व्यक्त केले.
मोताळा तालुक्यातील धामनगाव बढे येथील राजे छत्रपती कला महाविद्यालयात २९ मार्च रोजी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन विदर्भ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग हुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रा. एम. टी. जमाईवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्थापनेपासूनच महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग कार्यरत आहे. या विभागाने घेतलेले आतापर्यंतचे उपक्रम व विविध कामाबद्दल विभाग प्रमुख डॉ. महादेव रिठे यांनी प्रास्ताविकात सांगून अभ्यास मंडळाच्या कामाचे विश्लेषण केले.
त्यानंतर उदघाटक प्रा. डॉ. पांडुरंग हुडेकर यांनी कोरोना कालीन व नंतरच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकला. तर प्रा. जमईवार यांनी नवनियुक्त अभ्यास मंडळाद्वारे होणाऱ्या कार्यक्रमांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांमधून मयुरी पवार हिची तर सचिवपदी आरती पाटील, उपाध्यक्ष सूरज भोरे, सदस्य म्हणून प्राजक्ता तायडे, सुवर्णा रहाणे, अश्विनी राहणे, प्रिया किन्होळकर, प्रेम तायडे, शीतल भिसे, अभिषेक चव्हाण यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. नितीन जाधव, डॉ. शशिकांत शिरसाट, प्रा. दीपक लहासे, डॉ. भगवान गुरुडे, डॉ. विजय मोरे, डॉ. शाहिदा नसरीन, डॉ. कामिनी मामर्डे, डॉ. गजानन वानखेडे, गजानन मालठाणे, विष्णु उबाळे, राजू झिने यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.