आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीजोड प्रकल्प:वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू करावे

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था निर्माण करणारा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु करावे, अशी आग्रही मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने नदीजोड प्रकल्पा अंतर्गत वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने खासदार प्रतापराव जाधव यांनी या संदर्भाचा प्रश्न्‍ा लोकसभेत उपस्थित करुन वैनगंगा ते नळगंगा प्रकल्पाच्या कामाकडे सभागृहाचे लक्ष्‍ा वेधले.

नदीजोड प्रकल्पांतर्गत देशांतर्गत ज्या भागात नदीचे पाणी जास्त प्रमाणात आहे. त्या पाण्याचा उपयोग कमी पाणी क्षेत्र असलेल्या भागामध्ये करण्याच्या दृष्टीकोनातुन केंद्र सरकारच्या वतीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या मोठया प्रमाणात आहे. कारण विदर्भामध्ये सिंचनाची व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात नसल्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गीक पाण्यावरच शेती करावे लागते.

त्यामुळे अनेक वेळा नैसर्गीक अवकृपेमुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे उत्पन्न कमी प्रमाणात होते. विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, वाशीम, अकोला, वर्धा या जिल्हयांतील शेतकऱ्यांचे जीवनमान हे शेती व्यवसायावरच अवलंबुन असल्यामुळे निसर्गाच्या अवकृपेमुळे येथिल शेतकरी त्रस्त ‍ झाला आहे. वैनगंगा नळगंगा हा नदीजोड प्रकल्प झाल्यास या जिल्हयातील बहुतांश शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी पुष्टीही सरकारने केलेल्या सर्वेक्षणामध्ये करण्यात आले आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्या कमी होण्याच्या दृष्टीकोनातून वैनगंगा ते नळगंगा या नदीजोड प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर चालू करण्याच्या दृष्टीकोनातून कारवाई करावी, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे .

बातम्या आणखी आहेत...