आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:युवकाने पाठलाग करुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; खामगाव शहरातील घटना; आरोपीस अटक

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्याने जात असलेल्या एका सतरा वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १६ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील राठी प्लॉट भागात घडली. या प्रकरणी पीडित मुलीने काल रात्री उशिरा शविाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी युवकास अटक केली आहे. गौरव पुरुषोत्तम निमकर्डे (२१), रा राठी प्लॉट, फक्कड देवी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील राठी प्लॉट भागात राहणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी गौरव हा अनेक दविसांपासून तिचा पाठलाग करत होता. दरम्यान, काल सकाळी अकरा वाजता रस्त्याने जात असताना गौरवने दुचाकीने पाठलाग केला. तसेच भररस्त्यात अडवून लग्नाची मागणी घातली. यावेळी माझा अन् तुझा काहीही संबंध नाही, असे म्हटले असता संतप्त झालेल्या गौरवने मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीने घर गाठून घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर आई-वडिलांसह मुलीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला रात्रीच अटक केली आहे. पुढील तपास शविाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जायभाये हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...