आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कामात अडथळा:ड्युटीवर असलेल्या होमगार्डची‎ कॉलर पकडणे युवकाला भोवले‎

बुलडाणा‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्थानकावर ड्युटीवर‎ असलेल्या होमगार्डशी वाद घालून‎ त्याची कॉलर पकडून‎ धक्काबुक्की केल्याप्रकरणी शहर‎ पोलिस ठाण्यात एका सव्वीस‎ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎ होमगार्ड गजानन दगडू खेडेकर‎ यांनी बुलडाणा पोलिसांत दिलेल्या‎ तक्रारीनुसार, ५ मार्च रोजी त्यांची‎ ड्युटी बुलडाणा बसस्थानकावर‎ लावण्यात आली होती. दुपारी तीन‎ वाजेच्या सुमारास एका प्रवाशाने‎ येवून सांगितले की, बसमधून‎ त्याचे १४ हजार रुपये चोरीस गेले.‎ चोरीची घटना माहिती पडताच‎ होमगार्ड खेडेकर बस जवळ गेले‎ असता वाहकाने बसचा दरवाजा‎ बंद करून ठेवला होता. तेवढ्यात‎ एक युवक बसमधून उतरण्याचा‎ प्रयत्न करत असताना होमगार्डने‎ त्याला थांबवले. त्याने मला‎ दुसऱ्या बसने जायचे आहे, असे‎ सांगितले.‎

त्यावेळी होमगार्ड गजानन खेडेकर‎ व पोलिस कर्मचाऱ्याने राजेश‎ भागचंद साबळे रा. गोदरी तालुका‎ जामनेर जि.जळगाव खान्देश यास‎ थांबवण्याचा प्रयत्न केला असता‎ त्याने होमगार्डशी हुज्जत घालत‎ त्यांची कॉलर पकडून‎ धक्काबुक्की केली. तसेच त्यांना‎ शिविगाळ केली. नंतर पोलिस‎ कर्मचाऱ्यांनी त्या युवकास‎ बुलडाणा पोलिस ठाण्यात नेले.‎ यावेळी त्याने पोलिस ठाण्यात‎ सुद्धा ड्युटी अधिकारी नीलेश‎ लोधी यांच्यासोबत वाद घालून‎ ठाण्यात धिंगाणा घातला. तसेच‎ व्हिडिओ शूटिंग करू लागला.‎ या तक्रारीवरून बुलडाणा शहर‎ पोलिसांनी आरोपी राजेश भागचंद‎ साबळे याच्या विरुद्ध शासकीय‎ कामात अडथळा निर्माण‎ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...