आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिराचे आयोजन:तरुणांनी घेतली सामाजिक कार्याची प्रेरणा

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्या फाउंडेशनच्या वतीने वरवंड येथे आयोजित विचारधारा दुवा ग्राम शहरी अध्ययन शिबिरास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दि. १ ते ४ डिसेंबर या कालावधीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांच्या पुढाकाराने शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या चार दिवसीय निवासी शिबिरात महाराष्ट्रातील ५० पेक्षा अधिक तरुणांनी सहभाग घेतला. शिबिरात प्रामुख्याने श्रमदान, गटचर्चा, सामूहिक खेळ, समूह गीत, कौशल्य सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, निसर्ग भ्रमंती, चर्चासत्र, क्षेत्रभेट, विविध विषयांवर मार्गदर्शनाचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...