आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:भैय्युजी महाराज यांच्या आश्रमातील मंदिरात चोरी

खामगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जनुना शिवारातील भैय्युजी महाराज यांच्या आश्रमातील मंदिरातील दानपेटी व चांदीच्या पादुका मंदिराचा सेवेकरी रूपचंद राठोड याने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या विरुध्द शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भैय्युजी महाराज आश्रमात तालुक्यातील लोखंडा येथील शिवाजी देशमुख व शिर्ला नेमाने येथील रूपचंद हरि राठोड हे दोघे सेवेकरी आहेत. २१ नोव्हेंबरच्या दुपारी गादी गृहाच्या मंदिरातून सोळा हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका व महाकाली मंदिरातील दानपेटी फोडून ३ हजार रुपये आरोपी रूपचंद राठोड याने लंपास केले आहे. अशी तक्रार शिवाजी देशमुख यांनी शिवाजीनगर पोलिसांत दाखल केली आहे. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी रूपचंद राठोड विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिवाजी नगरचे पोहेकॉ नीलेश चव्हाण हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...