आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखामगाव तालुक्यातील पिंपळगावराजा येथील शेतकरी संजय टेमकर यांच्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी टाकलेले स्प्रिंकलर अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे. ही घटना सोमवार, २ जानेवारी रोजी उघडकीस आली. या चोरीमुळे शेतकऱ्याचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची घबराट पसरली असून परिसरात होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांवर पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
याबाबत संजय टेमकर यांनी पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यावर्षी विहिरींना पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी आपली शेती बागायती केली आहे. मात्र महावितरण कंपनी कडून सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यात शेतकऱ्यांची स्प्रिंकलर खरेदी करून स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिके जगवण्यासाठी धडपडत असतांना, मात्र चोरट्यांचा डोळा स्प्रिंकलरवर सुद्धा लागला आहेत.
परिसरातील राहुड, वाकुड, तांदुळवाडी यासह अनेक खेडेगावातील स्प्रिंकलर चोरट्यांनी मागील काही दिवसांपूर्वी चोरी केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची गरज असून त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. पोलिसांनी या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी संजय टेमकर यांनी केली . चोरट्यांनी लंपास केलेले स्प्रिंकलरचे सेट.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.