आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपच्या वाचाळवीर नेत्यांमध्ये महापुरुषांबद्दल अपशब्द वापरण्याची स्पर्धा लागली आहे. महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल कोट्यवधी जनतेचा तळतळाट त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, कालचा आणि आजचा सूर्य त्यांचा असला तरी २०२३ चा सूर्य हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहील. महापुरुषांची सन्मान यात्रा ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षाच्या पातळीवर आपण स्वतः पुढाकार घेऊ असे प्रतिपादन वक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आ.अमोल मिटकरी यांनी केले. माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून १७ डिसेंबर पासून महापुरुषांच्या सन्मानार्थ निघालेल्या सन्मान यात्रेची समारोपीय सन्मान सभा ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी देऊळघाट येथे झाली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आ.अमोल मिटकरी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, यात्रेचे संयोजक तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने, मनोज दांडगे, अनुजा सावळे, मनीष बोरकर, निर्मला तायडे, बबलू शेठ, सुभाष पाटील, अतुल लोखंडे, संतोष पाटील, रुपचंद पसरटे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ.मिटकरी म्हणाले की, मुळात महाराष्ट्रात सन्मान यात्रा घेण्याची वेळ का यावी याबद्दल बोलण्याची गरज आहे. “छत्रपती शिवाजी महाराज पुराने जमाने की बात है हे वाक्य राज्यपालांच्या ऐवजी एखाद्या मुस्लिमाने म्हटलं असत तर काय झालं असत? असा सवालही त्यांनी यावेळी केला. समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कुणी विचारलं नसत असा एकेरी उल्लेख राज्यपालांनी केला होता. यावेळी मिटकरी यांनी भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची यादीच वाचून दाखवली.
यानंतर जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी देशासाठी हजारो महापुरुषांनी आपले बलिदान दिले. देशासाठी बलिदान देणारे हिंदू होते आणि मुस्लिमही. मात्र देशाच्या जडण घडणीत मुसलमानांचा काहीच वाटा नव्हता असा आव भाजपच्या नेत्यांकडून आणल्या जात असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी केला.
महाराष्ट्रात पहिल्यांदा सन्मान यात्रा काढण्यात आली. हे कुणाला सुचलं नाही पण दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून निघालेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. ही संकल्पना आता महाराष्ट्राच्या पातळीवर राबवण्यात येणार असल्याचेही म्हणाले. प्रास्ताविका यात्रेचे संयोजक दत्तात्रय लहाने यांनी यात्रेची भूमिका विषद केली. यावेळी मनोज दांडगे, अनुजा सावळे यांचेही समयोचीत भाषण झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.