आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशा‎:शासनाकडून अद्याप मदतीची घोषणाच नाही‎

जानेफळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतीच्या पावसाने घातल्याने मोठ्या‎ प्रमाणावर सोयाबीनसह इतर पिकाचे‎ नुकसान झाले आहे. पावसामुळे‎ सोयाबीनच्या सुडया व सोंगलेली‎ सोयाबीन अक्षरशा पाण्यात तरंगत होत्या.‎ हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने‎ हिरावून घेतल्यामुळे शेतकरी चांगलाच‎ अडचणीत सापडला होता. एवढे मोठे‎ नुकसान होवूनही महसूल विभागाकडून‎ लावण्यात आलेली मिलिमीटरची मर्यादा‎ शेतकऱ्यांसाठी घातक ठरली. शिवाय‎ शासनाकडून शेतकऱ्यांना आजपर्यंत‎ कोणतीही मदत मिळाली नाही. नुकसान‎ झाल्याचे सर्वश्रृत असताना आज ना उद्या‎ मदतीची घोषणा करेल, अशी आशा‎ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लागली आहे.

‎ परंतु अद्यापही शासनाकडून कुठलीच‎ घोषणा न केल्याने काय करावे, असा प्रश्न‎ शेतकऱ्यांना पडला आहे.‎ कधी नव्हे यदा जानेफळ परिसरात‎ परतीच्या पावसाने हजेरी लावून शेती‎ पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. हाती‎ आलेल्या पिकाचे डोळ्यासमक्ष पिकाची‎ नासाडी पाहुन शेतकरी चांगलच हतबल‎ झाला आहे. त्यामुळे नुकसानीचा सर्वे‎ होऊन मदत मिळेल, अशी अपेक्षा‎ शेतकऱ्यांना होती. परंतु प्रत्यक्षात एकही‎ लोक प्रतिनिधी या परिसरात फिरकलाच‎ नाही. त्यांनी एकाही शेतात जाऊन‎ झालेल्या नुकसानीची पाहणी केली नाही.‎ तर तलाठी देखील शासनाकडून कुठलीच‎ मदत घोषित झाली नसताना‎ शेतकऱ्यांकडून पासबुक झेरॉक्स जमा‎ करून त्यांना आशा दाखवण्याचे काम‎ करत आहेत. याबाबत मंडळ‎ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता‎ त्यांनी जर मदतीची घोषणा झाली तर‎ आमची वेळेवर तारांबळ होऊ नये,‎ यासाठी आम्ही शेतकऱ्यांना सांगितलेल्या‎ झेरॉक्स त्वरित देता याव्यात, यासाठी जमा‎ करून ठेवतो, असे सांगितले.

वास्तविक‎ पाहता शासनाकडून कोणत्याही मदतीचे‎ आदेश नसताना शेतकऱ्यांना मदत मिळेल‎ अशा प्रकारची आमिष दाखवण्याचे काम‎ तलाठी करीत आहेत. हा प्रकार‎ शेतकऱ्यांची चेष्टा करण्यासारखाच आहे.‎ कारण शेतकरी मदत आली असे समजून‎ पासबुक झेरॉक्स तलाठ्याकडे देत आहेत.‎ वास्तविक पाहता तलाठ्यांना झेरॉक्स‎ जमा करण्याचे आदेश आहेत काय, की‎ त्यांनी मनाने निर्णय घेतला आहे, असे‎ प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.‎ शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना सुद्धा‎ खोके आणि बोके यामध्येच सध्या‎ राजकारण सुरू आहे. यावरुन कोणालाच‎ शेतकऱ्यांचा कळवळा येत नाही. परंतु‎ आता शेतकरीही आक्रमक होताना दिसत‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...