आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहितीचा अभाव:उज्ज्वला गॅस योजनेचा वापर न करणाऱ्यांचे सर्वेक्षण नाहीच

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पाच लाख ७४ हजार ९१६ शिधापत्रिकाधारक असून यामध्ये ६२ हजार ५६७ अंत्योदय म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकाधारकांपैकी पाच लाख २५ हजार ६३७ शिधापत्रिकाधारकांकडेच गॅस जोडणी आहे. जवळपास ४९ हजार २७९ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडणी नाही. त्यातच उज्ज्वला गॅसचे लाभार्थी आहेत. त्यांनी गॅसचे दर वाढल्याने आपले गॅस कनेक्शनच बंद ठेवले आहे. अशा गॅस बंद करणाऱ्यांचे सर्वेक्षण अद्याप गॅस कंपनीने केले नसल्याने पुरवठा विभागालाही उज्ज्वला गॅस किती बंद झाले याची माहिती नाही. जिल्ह्यात उज्ज्वला गॅस बंद झाल्याचा आरोप होत आहे. तर गतवर्षीपेक्षा गॅस वापरणाऱ्यांची संख्या अधिक झाल्याचा दावा पुरवठा विभाग करत आहे.

गतवर्षी जिल्ह्यात पाच लाख ५२ हजार ३२५ शिधापत्रिकाधारक होते. यावेळी त्यात वाढ झाली आहे. गतवर्षी एक गॅस असणारे तीन लाख ६२ हजार ५५७ लाभार्थी होते. यंदा तीन लाख ८१ हजार ६७२ इतकी लाभधारकांची संख्या झाली आहे. म्हणजे १९ हजार ११५ गॅसधारक वाढले आहेत. दोन गॅस असणारे एक लाख ४८ हजार ६८३ शिधापत्रिकाधारक होते. गतवर्षी २५ हजार ६६८ बिगर गॅसधारक जिल्ह्यात होते. त्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेचा धडाका सुरु झाला, पण उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी गॅस महागल्याने गॅस बंद करत असल्याचा आरोप होत असताना १९ हजार लाभार्थी गतवर्षीपेक्षा वाढलेले दिसत आहे.

तर एकूण जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची संख्या लक्षात घेता गॅस असणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वच पात्र लाभार्थींकडे गॅस कनेक्शन केव्हा उपलब्ध होईल. ही तफावत मात्र पुरवठा विभागाने गॅस एजन्सीकडून भरुन काढली की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातून २०१८ पासून केरोसीन बंद करण्यात आले आहे. केरोसीन वापरणारे ४९ हजार २७८ इतकी संख्या आहे. या केरोसीनधारकांना गॅसची आवश्यकता अजून पूर्ण झाली नाही. त्यातच देऊळगाव राजा व चिखली येथे एकही केरोसीन शिधापत्रिकाधारक नाही. जळगाव जामोद येथे ५१२८, मेहकर येथे २४७४, खामगाव येथे ३५१२, सिंदखेड राजा येथे ६३५४, लोणार येथे ९४४, नांदुरा येथे ३२७९, मोताळा येथे १६१६, संग्रामपूर येथे १३५१६, मलकापूर येथे १२४३, बुलडाणा येथे ८६०८ व शेगाव येथे २६०४ केरोसीन शिधापत्रिकाधारक आहे.

जिल्ह्यातील गॅसधारकांची संख्या
तालुका एक गॅसधारक दोन गॅसधारक

जळगाव जामोद २६०४३ ३१७०
मेहकर ३२५३२ १६२६६
खामगाव ४०४८० १६०५५
सिंदखेड राजा २६९७९ ५९८५
लोणार २८३६९ ३७९२
नांदुरा ३९१८४ ५९४७
मोताळा ५०९६ २७००५
संग्रामपुर १६२२८ ४८८०
मलकापूर २१२५७ ११९१३
देऊळगाव राजा २५८७५ ३०७८
चिखली ४२५४५ १६५३०
बुलडाणा ४१७७२ १३९२४
शेगाव ३५२१२ १५५२०

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक
जळगाव जामोद ३४३४२, मेहकर ५१२७२, खामगाव ६००४७, सिंदखेड राजा ३९३१८, लोणार ३३१०५, नांदुरा ४८४१०, मोताळा ३३७१७, संग्रामपूर ३४६२४, मलकापूर ३४४१३, देऊळगाव राजा २८९५३, चिखली ५९०७५, बुलडाणा ६४३०४, शेगाव ५३३३६.

बातम्या आणखी आहेत...