आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात नवा प्रयोग:उत्पादनातील घट टाळण्यासाठी स्वतः पिकवलेला आंबा विकतात स्वतःच; इतर शेतकऱ्यांसमोर ठेवला आदर्श

चिखलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोनड खुर्द या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले यवतमाळचे उपजिल्हाधिकारी डॉ. शरद ज्ञानेश्वर जावळे पाटील हे स्वतःच्या शेतात लावलेल्या अडीच एकर शेतातील आंबा पत्नी रेखा आणि कन्या देवयानी यांच्या मदतीने यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे विक्री करत आहेत. स्वतः पिकवलेला माल स्वतः विकल्यास उत्पादनातील तोटा टाळता येतो हे दाखवून देत इतर शेतकऱ्यांसमोर त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

चिखली तालुक्यातील कोनड खुर्द हे यवतमाळचे उपजिल्हाधिकारी शरद ज्ञानेश्वर जावळे यांचे गाव असून तेथे त्यांचे आई-वडील, भाऊ, भावजय हे शेती पाहातात. शरद जावळे यांनी सोयाबीन आणि तूर या पिकांना पर्याय म्हणून आंबा लागवडीचा सल्ला वडिलांना दिला. तो त्यांनी अंमलात आणत दोन एकरात १४ बाय ७ वर ८७० आंब्याच्या झाडांची लागवड केली. तीन वर्षांनंतर यावर्षी आंबा उत्पादन घेत आहेत. दरम्यान, आंबा विक्रीसाठी व्यापाऱ्यांशी संपर्क केला. तसेच व्यापाऱ्यांना आंब्याचे फोटो आणि २५० ते ३५० ग्रामपर्यंत वजन असल्याचे व्हिडिओ पाठवण्यात आले. यानंतर काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या बगीच्याला भेट देऊन वेगवेगळी कारणे पुढे करून दोन दिवसात आंबा नाही तोडला तर नुकसानीची भीती दाखवून कमी भावात आंबा मागितला. उपजिल्हाधिकारी जावळे आणि त्यांचे वडील व्यापाऱ्यांना पुरते वैतागून गेले. त्यांनी आपल्या पद प्रतिष्ठेचा विचार न करता आंबा तोडून पेटीत भरला आणि स्वतःच्या गाडीने नोकरीच्या गावी नेऊन पत्नी रेखा आणि मुलगी देवयानी यांनी अंबा विक्री सुरू केली. आंबे खात्रीचे असल्याने ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

रसायनाशिवाय आणि विषमुक्त कोणत्याही प्रक्रिया न करता झाडांचा तोडलेला व शेतात पॅकिंग करून दिला. लोकांना गुणवत्तेचे खात्री दिल्यास आपण आंबे विकू शकू, ही खात्री जावळे यांना होती. त्यांनी आजपर्यंत १.१२ टन हापूस आंबा घरी बसून ऑर्डरवर विक्री केला. बाजार भावाने विक्री करूनही व्यापाऱ्यांनी मागितलेल्या किंमतीपेक्षा दुप्पट जास्त भाव मिळाला. जावळे कुटुंबातील, आई निर्मला, वडील ज्ञानेश्वर, भाऊ भरत, भावजय सुरेखा जावळे यांनी केलेल्या मेहनतीचे चीज डॉ. शरद जावळे यांच्यामुळे झाले. त्यांच्या कल्पनेला साथ देणारी मुलगी देवयानी, पत्नी रेखा यांनी देखील इतरांसमोर आदर्श ठेवला.

वडिलांच्या चेहऱ्यावरची तणावाची जागा आनंदाने घेतली
थोडी रिस्क घेत लोक काय म्हणतात याचा विचार न केल्यास तसेच आपल्या शेत मालाच्या गुणवत्तेमध्ये तडजोड न केल्यास आपल्या व्यवस्थित भाव मिळतो. माझ्या बाबाच्या चेहऱ्यावर असणाऱ्या तणावाची जागा आता आनंदाने घेतली याचे समाधान आहे.
त्यांच्या मेहनतीचे चीज करण्यासाठी मला हे करणे गरजेचे होते. कारण बाबाचा सुद्धा आत्मविश्वास कमी झाला असता तो कमी होऊ न देण यासाठी मला हे पाऊल उचलणे गरजेचे होते.
-डॉ. शरद जावळे, उपजिल्हाधिकारी, यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...