आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची घटनास्थळी भेट:घारोड शिवारात चोरट्यांचा कोंबड्यांवर डल्ला

खामगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुरट्या चोरांनी आता तालुक्यातील घारोड येथील एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधून शेकडो कोंबड्या लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.तालुक्यातील घारोड येथील शेतकरी नारायण लक्ष्मण माथनकार हे आपल्या पोल्ट्री फार्ममधून रात्री ९ वाजता जेवायला घरी आल्यानंतर जोरात पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्यांना शेतात परत येण्यास उशीर झाला. तेवढ्यात चोरांनी या बाबीची संधी साधून घारोड-अटाळी रोडवर असलेल्या शेतातील पोल्ट्रीफार्ममधून मोठ्या व काही लहान अशा शेकडो कोंबड्या पोल्ट्री फार्ममधील शटर तोडून लंपास केल्या. रात्री उशिरा परतल्यानंतर घडलेला प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आला. या घटनेची तक्रार नारायण मानकर यांनी हिवरखेड पोलिसांना दिली. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांच्या पथकाने पोल्ट्री फार्मवर येऊन पंचनामा केला. या वेळी पीएसआय पवार, पोकॉ. गवई, रवी गायकवाड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...