आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर पोलिसांत गुन्हा दाखल:बुलडाण्यात एटीएम फोडण्याचा‎ चोरट्यांचा प्रयत्न फसला‎ ;  आरोपीचा शोध सुरू‎

बुलडाणा‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील स्टेट बँक चौकातील बँक ऑफ‎ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा‎ प्रयत्न केल्याची घटना ५ मार्च रोजी‎ पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.‎ या प्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या मुख्य‎ प्रबंधकांच्या तक्रारीवरून शहर पोलिस‎ ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎ बँक ऑफ इंडियाचे येथील स्टेट बँक‎ चौक परिसरात एटीएम आहे. ५ मार्च रोजी‎ पहाटे अज्ञात चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश‎ करुन एटीएमची स्क्रीन फोडण्याचा प्रयत्न‎ केला.

दरम्यान, नाकाबंदीच्या रात्र गस्तीवर‎ असलेले पोलिस कर्मचारी रमेश कानडजे,‎ बंडू खरात व वाहन चालक कोल्हे यांना हा‎ प्रकार दिसताच त्यांनी ताबडतोब वाहन उभे‎ करून दोन्ही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न‎ केला. परंतु आरोपी पळून जाण्यात यशस्वी‎ ठरले.‎ यावेळी पोलिसांनी परिसरात आरोपींचा‎ शोध घेतला. परंतु ते कोठेच आढळून आले‎ नाहीत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरटे‎ एटीएम फोडण्यात यशस्वी होऊ शकले‎ नाहीत.‎

बातम्या आणखी आहेत...