आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसला:चोरट्यांनी दोन औषधी दुकान फोडले ; इलेक्ट्रॉनिक व फर्निचरचे दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला

डोणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मालेगाव रोडवरील विक्रांत कापड दुकानाच्या बाजूला असलेल्या लक्ष्मी मेडिकल व गोपलेश्‍वर मेडिकल या दोन दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी पन्नास हजार रुपयांचा माल लंपास केला. परंतु शिवकृपा इलेक्ट्रॉनिक व फर्निचर या दुकानाचे कुलूप तोडून सुद्धा दुकानात प्रवेश करता न आल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. येथील मालेगाव रोड स्थित शिवकृपा इलेक्ट्रॉनिक व फर्निचर या दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु आतून सेफ्टी लॉक असल्याने चोरट्यांना ते फोडता आले नाही. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा विक्रांत कापड दुकानाजवळ असलेल्या लक्ष्मी मेडिकल कडे वळवला. त्या ठिकाणी मेडिकल स्टोअरच्या समोरील शटरचे कुलुप तोडून ३ हजार रुपये रोख रक्‍कम चोरली. तर संगणक संचाची तोडफज्ञेड केली. त्यानंतर चोरट्यांनी माऊली हॉस्पिटल जवळील मोरेश्वर मेडिकल स्टोअरच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील ४९ हजार व सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचे डीव्हीआर असा एकूण ५० हजारांचा माल लंपास केला. याच भागात ते आणखी ठिकाणी चोरी करणारे होते परंतु माऊली हॉस्पिटलमध्ये रात्री पावणे चार वाजेच्या सुमारास एक रुग्ण घेऊन ऑटोने आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला

बातम्या आणखी आहेत...