आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दुचाकीवरील तीन लाखांची बॅग चोरट्यांनी केली लंपास

नांदुराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीवर ठेवलेली तीन लाख रुपयांची बॅग अज्ञात दोन चोरट्यांनी अलगद लंपास केल्याची घटना आज ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास येथील पोस्ट ऑफीस समोरील ठाकरे ऑटो पार्क समोर घडली. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील रहिवासी प्रमोद ज्ञानदेव डामरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मला व माझ्या भावाला घर बांधायचे असल्याने आज सकाळी मी स्टेट बँकेतून तीन लाख रुपये काढून ते बॅगेत ठेवले. बॅग दुचाकीला लटकवून येत असतांना रस्त्यात दुचाकी नादुरुस्त झाली. ती दुरुस्त करण्यासाठी दुचाकीसह ठाकरे ऑटो पार्क येथे आलो. या ठिकाणी दुचाकी उभी करुन ठाकरे ऑटो पार्कवर गेलो. तेथुन प्लगची कॅप घेऊन परत आलो. त्यावेळी पैशाची बॅग माझ्या होतात होती. त्यानंतर प्लग कॅप लावण्यासाठी पैशाची बॅग गाडीच्या सीटवर ठेवली. त्यानंतर प्लग लावण्यासाठी खाली वाकलो असता तेवढयात पंधरा वर्षीय मुलगा बॅग घेऊन पळाला. यावेळी काही अंतरावर असलेल्या एका युवकाकडे बॅग देऊन दोघेही पळून गेले. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...