आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:सुलतानपुरात एकाच रात्रीत तीन घरी चोरट्यांचा डल्ला ; दोन घरातून 85 हजारांचा माल लंपास

सुलतानपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१ जूनच्या मध्यरात्री वॉर्ड क्रमांक पाच मध्ये अज्ञात चोरट्यांनी शेजारी-शेजारी असलेल्या तीन घरी डल्ला मारला. परंतु त्यांना एका घरात काहीच हाती लागले नाही. तर दोन घरातून सोन्याची पोत व रोख रक्कम असा एकूण ८५ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक पाच मधील रहिवासी बबन पनाड यांच्या पत्नी आपल्या अंगणात झोपल्या असता मध्यरात्रीनंतर अंधाराचा फायदा घेत अंगणात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी तोडली. दरम्यान, महिलेस जाग आल्याने चोरटा व महिलेत झटापट झाली. या झटापटीत महिलेच्या गळ्यावर दुखापत झाली. त्यानंतर चोरटा ४५ हजाराची पोत घेवुन पसार झाला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बाजूलाच राहत असलेल्या सिद्धार्थ पवार यांच्या घराकडे वळवला. यावेळी चोरट्यांनी पवार कुटूंब गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत घर बांधकामासाठी घरात ठेवलेले ४० हजार रुपये घेवून पोबरा केला.

बातम्या आणखी आहेत...