आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद:सोमनाथ महाराज मंदिरातील दानपेटी फोडणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या डोंगरशेवली येथील सोमनाथ महाराजाच्या मंदिरातील दान पेटी फोडणारे दोन अज्ञात चोरटे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ही घटना आज १ जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे. डोंगर शेवली गावाच्या पूर्वेस अर्धाकिलोमिटर अंतरावर सोमनाथ महाराजांचे भव्य असे मंदिर आहे. शहरासह परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात मंगळवारी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी मंदिराचे चॅनेल गेट तोडून आत प्रवेश करत दान पेटी फोडली. परंतु दानपेटी फोडत असताना दोन्ही चोरटे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दान पेटीतून किती रक्कम चोरट्यांनी लंपास केली, याची माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...