आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:मासरुळ ग्रामसेवा सहकारी सोसायटीवर शिवसेनेच्या तेराही उमेदवारांचा विजय

मासरूळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहकारातील निवडणुकांमध्ये शिवसेना आग्रही भूमिका आतापर्यंत घेत नव्हती. मात्र मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अलीकडे शिवसेना सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये ताकदीने उतरत असून मासरूळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. येथील सोसायटीच्या निवडणुकीत तेरा विरुद्ध शून्य असा दणदणीत विजय मिळवत सहकारात ही मासरूळ मध्ये फक्त शिवसेनाच असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले.

मासरूळ ता. बुलडाणा येथील ग्रामसेवा सहकारी सोसायटी वर शिवसेनेचा भगवा फडकला. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार २ मे रोजी करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत बोलत होते. मासरूळ ग्रामसेवा सहकारी सोसायटी मध्ये १३ सदस्य संख्या असून बऱ्याच विलंबानंतर ही निवडणूक लागली. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचे समर्थक माजी सरपंच शेषराव किसन सावळे यांच्या नेतृत्वामध्ये जनसेवा ग्राम विकास पॅनलचे १३ उमेदवार व इतर काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पक्ष मिळून, तीन माजी सरपंच उमेदवारासह शेतकरी पॅनलचे १३ उमेदवार समोरासमोर उभे होते.

त्यामध्ये जनसेवा ग्रामविकास पॅनेलने जोरदार मुसंडी मारत १३ ही उमेदवार विजयी झाले. शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी मासरूळ येथे जाऊन जनसेवा पॅनलचे विजयी उमेदवार भगवान जानकीराम आल्हाट, विलास त्र्यंबक भगत, संभाजी भगवंतराव देशमुख, श्रीराम काशीनाथ गायकवाड, कडूबा रामभाऊ घुले, देवराव रामा कापरे, सीताराम मैनाजी पवार, सुनील लक्ष्मण सावळे, नंदाबाई हरिभाऊ सिनकर, रुक्मिणीबाई दादाराव काटोले, मधुकर किसन सिनकर, सपकाळ गोविंदा सोनाजी, सयाजी भिकाजी सावळे या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...