आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा निकाल:यंदाही मुलांपेक्षा मुलींच ठरल्या उत्तीर्ण होण्यात वरचढ, अमरावती विभागातून जिल्हा पहिला ; विद्यार्थीनींनी मारली बाजी

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल ऑनलाइन घोषित करण्यात आला. त्यात बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ९६.३६ टक्के लागला. या निकालात मुलींनी चमकदार कामगिरी करत आपण मुलांपेक्षा वरचढ असल्याचे सिद्ध केले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.०६ तर मुलींचे प्रमाण ९६.७५ टक्के इतके आहे. तर अमरावती विभागातून जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील ३४५८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १९३३८ मुले तर १५२४७ मुलींनी परीक्षा दिली होती. यामध्ये १८४६९ मुले तर १४६२४ मुली उत्तीर्ण झाले. असे एकूण ३३०९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून १००७३ मुले व ७५१३ मुली असे १७५८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १०००४ मुले तर ७४१६ मुली असे १७४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ६३८६ मुले तर ५६९६ मुली असे १२०८२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६०२१ मुले व ५३२४ मुली असे एकूण ११३४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून १५४० मुले व १६४२ मुली असे एकूण ३१८२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४६२ मुले व १५८९ मुली असे एकूण ३०५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रावीण्य श्रेणीत १०९१८ तर प्रथम श्रेणीत १४१८६, द्वितीय श्रेणीत ६५८८ तृतीय श्रेणीत ५८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांपेक्षा मुलींनीच यावेळी बाजी मारली आहे.

जि. प. च्या कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल उल्लेखनीय

शासनाच्या शाळा म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असणाऱ्या जिल्हा परिषदांच्या शाळांचा निकाल यंदा चांगला लागला आहे. बुलडाणातील जि. प. ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल ९६.१५ टक्के, कला शाखा व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. जि. प. पाडळीचा कला शाखेचा निकाल १०० टक्के आहे. जि. प. उर्दू देऊळघाटचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.६१ टक्के लागला आहे. जि. प. ज्युनिअर कॉलेज बोथा काजी तालुका खामगाव १०० टक्के, जि. प. गर्ल ज्युनिअर खामगाव १०० टक्के, जि. प. सेकंडीयर, हायर सेकंडरी पिंपळगाव राजा तालुका खामगाव ९६.४२ टक्के, म्युनिसिपल हायर सेकंडरी स्कूल मलकापूर विज्ञान शाखा १०० टक्के कला शाखा ९८.३१ टक्के, जिल्हा परिषद हायर सेकंडरी स्कुल पातुर्डा तालुका संग्रामपूर कला शाखा १०० टक्के निकाल लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...