आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:तिघा बापलेकांनी एकास गोठ्यात‎ नेऊन जबरजस्तीने विष पाजून मारले‎

नांदुरा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही तुझ्याशी यापुढे भांडण करणार‎ नाही, तू आमच्या सोबत चल,‎ आम्हाला तुझी माफी मागायची आहे,‎ असे बोलून तिघा बापलेकांनी‎ एकाला घरून बोलवून नेले व‎ गुरांच्या गोठ्यात नेऊन जबरदस्तीने‎ विष पाजून ठार मारले. ही घटना‎ तालुक्यातील येरळी येथे मंगळवारी‎ दुपारी साडेचार ते पाच वाजेदरम्यान‎ घडली.

या प्रकरणी नांदुरा पोलिस‎ ठाण्यात तिघा बापलेकांविरोधात‎ खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे. रामदास लक्ष्मण वसतकार‎ (५१) रा. येरली असे मृताचे नाव‎ आहे.‎ सविस्तर वृत्त असे की, मृताचा‎ मुलगा श्रीराम रामदास वसतकार‎ (२३) रा. येरली याने पोलिस ठाण्यात‎ दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे‎ की, अमोल आत्माराम दिवनाले,‎ आत्माराम किसन दिवनाले, सुरेश‎ आत्माराम दिवनाले सर्व रा. येरळी हे‎ त्याच्या वडिलांना नेहमी दारु‎ पिण्यासाठी पैसे मागत होते. त्यांना‎ पैसे देणे बंद केल्याने ते नेहमीच‎ माझ्या वडिलांना शिविगाळ करुन‎ जीवे मारण्याच्या धमकी देत तसेच‎ आरोपी अमोल एक दिवस म्हणाला‎ की, तुला एखाद्या दिवशी फाशी देतो‎ किंवा तुला विष पाजून मारून‎ टाकतो.

३ जानेवारीच्या दुपारी दोन‎ वाजता आरोपी अमोल माझ्या‎ वडिलांना म्हणाला की, तू दारू‎ पिण्याकरिता आमच्या सोबत चल‎ नाही तर दारू पिण्याकरिता पैसे दे,‎ वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने‎ तिघा बापलेकांनी त्यांना शिविगाळ‎ करत मारहाण केली. त्या घटनेची‎ वडिलांनी पोलिस स्टेशनला तक्रार‎ केल्याने आरोपींनी संगनमत करून‎ माझ्या घरी येऊन माझ्या वडिलांना‎ म्हणाले की, तू आमच्या सोबत चल‎ आम्हाला तुझी माफी मागायची आहे.‎ यापुढे आम्ही तुझ्या सोबत, भांडण‎ करणार नाही असे गोड बोलून माझ्या‎ वडिलांना घरुन घेऊन गेले. काही‎ वेळानंतर समाधान लक्ष्मण वसतकर‎ हे धावत धावत माझ्या घरी आले.‎ त्यांनी सांगितले की, अमोल त्यांचा‎ भाऊ व त्यांचे वडिल तुझ्या वडिलांना‎ मारहाण करून काही तरी‎ जबरदस्तीने पाजत आहेत.

त्यामुळे‎ मी घटनास्थळी जाऊन बघितले‎ असता माझे वडील बेशुद्ध अवस्थेत‎ पडले होते. त्यांच्याजवळ मोनोसिल‎ फवारणीचे विषाची बॉटल पडलेली‎ होती. त्यांच्या तोंडातून फेस येत होता‎ व त्यांच्या तोंडाचा औषधाचा वास‎ येत होता. त्यावेळी मी व समाधान‎ वसतकार यांनी त्यांना प्राथमिक‎ आरोग्य केंद्र नांदुरा येथे आणले‎ असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत‎ केले.

आरोपी अमोल यांचा भाऊ व‎ त्याच्या वडिलांनी माझ्या वडिलांना‎ जबरदस्तीने मोनोसील नावाचे विषारी‎ औषध पाजून, जीवानिशी ठार मारले‎ आहे या तक्रारीवरून आरोपी‎ दिवनाले तिघे बाप लेक यांच्या विरुद्ध‎ गुन्हा दाखल केला असून अमोल,‎ दिवनाले, सुरेश दिवनाले यांना अटक‎ केली आहे. तर आत्माराम‎ दिवनालेचा याचा पोलिस शोध घेत‎ आहेत.

बातम्या आणखी आहेत...