आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेऊळगावराजा तालुक्यातील संत चोखा सागर धरणात ८५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पावसामुळे शुक्रवारी धरणात ८५ टक्के जलसाठा होता. त्यामुळे शुक्रवारी दुपारी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती अभियंता तिरमारे यांनी दिली. कर्मचारी गुंजाळ, पुरुषोत्तम भागिले, खार्डे, सानप यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बुद्रुक व खुर्द, टाकरखेड वायाळ व भागिले, सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ, साठेगाव, हिवरखेड, राहेरी खुर्द, तडेगाव, राहेरी बुद्रुक, ताड शिवणी, देवखेड, पिंपळगाव कुडा, लिंगा, खापरखेर्डा, रायगाव, सावरगाव तेली या गावांचा समावेश आहे. कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क असून पोलिस यंत्रणेलाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
खडकपूर्णा प्रकल्पात ८५ टक्के जलसाठा निर्माण झाल्यामुळे प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.