आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीपातील एक लाखापेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांना यंदा फटका बसला असतानाच धुके पडणे, थंडगार वारा सुटणे, गरम होणे अशा विविध कारणांमुळे यंदाचे रब्बी पिके अडचणीत येण्याची शक्यता आहे. गहु पिकांना अडचण येत असताना हरभरा पिकांवरही घाटेअळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. जिल्ह्यात रब्बीचा पेरा तीन लाख १४ हजार ९४८ हेक्टर क्षेत्रावर झाला असून यामध्ये हरभऱ्याचा पेरा दोन लाख २४ हजार २० हेक्टरवर करण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये हवामानातील बदलामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हरभऱ्याचे पीक सध्या हे काही ठिकाणी वाढीच्या तर काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. यादरम्यान घाटे अळीच्या प्रादुर्भाव झाला आहे. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात आणि गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने आणि कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बिबी येथील शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करताना.
पक्षी आणू शकतात घाटे अळी नियंत्रणात या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करताना घाटे अळीचे परभक्षक बगळे, मैना, राघो, नीळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामध्ये फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. तर अवाजवी कीटकनाशकांची फवारणी केल्यास पक्षी कीटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे कीटकनाशकांचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल, त्या शेतामध्ये बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर २० पक्षी थांबे) तयार करून शेतामध्ये लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी पहिली फवारणी ५० टक्के फुलोऱ्यावर असताना करावी.
वन्य प्राण्यांचे संकट बळावले माकडांचाही उच्छाद सुरु झाला आहे. ते सुध्दा दाणे भरलेले हरबरे खाऊन पीक नष्ट करत आहेत. वन्य प्राण्यांचाही हैदोस वाढला आहे. रोही, हरीण यांचे कळप येऊन रब्बीचे पीक उद्ध्वस्त करत आहे. त्याचा कोठे अहवाल घेतला जात नाही. या प्राण्यांना इजाही पोहोचवले जात नाही. कारण त्यासाठी कायदे आडवे येतात. परंतु, शेतकऱ्यांनी पिकांवर होणारे अळयांचा प्रादुर्भाव लक्षात घ्यावा की, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करावे हा प्रश्नच आहे. अळयांपासून संरक्षण एकदा करण्यासाठी उपाययोजना होऊ शकते. पण वन्य प्राण्यांचे काय. बाबुराव नरोटे, शेतकरी संघटना
हरभरा लागवड अशी
लोणार १७९८० खामगाव १५२१२ शेगाव १६०४७ मलकापूर ५३७८ मोताळा ५५६३ नांदुरा ४३४१ जळगाव जामोद ५४१३ संग्रामपूर ७५८७ चिखली ४२९६० बुलडाणा ४१३७८ देऊळगाव राजा ७३३९ मेहकर ३८६५५ सिंदखेड राजा १६१७०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.