आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:चाकूच्या धाकावर तिघांनी लक्झरी बस चालकास लुटले ; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कट मारल्याच्या कारणावरून दुचाकीने आलेल्या तीन युवकांनी लक्झरी बसला थांबवत चाकूचा धाक दाखवून चालकाच्या खिशातून दोन हजार रुपये जबरीने काढून घेतले. ही घटना मोताळा ते मलकापूर मार्गावरील घुस्सर फाट्याजवळ १ सप्टेंबरला रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील परंतु सध्या सुरत येथे राहत असलेले सुभाष खरात यांच्याकडे लक्झरी बस आहे. १ सप्टेंबरला ते बुलडाणा मलकापूर मार्गाने जी.जे. १४ एक्स २१११ या क्रमांकाची लक्झरी घेऊन सुरतकडे जात होते. यावेळी लक्झरीत चिखली येथील चालक अमर खरात हे कॅबिनमध्ये बसलेले होते. रात्री पावणे आठच्या सुमारास घुस्सर फाट्यासमोर तीन अज्ञात युवकांनी लक्झरीसमोर येऊन कट मारल्याच्या कारणावरून लक्झरी थांबवली. या वेळी त्यातील एकाने चालकाला चाकूचा धाक दाखवून आमच्या दुचाकीला तू कट मारला आहे. त्यामुळे माझ्या मित्राला मार लागला असून, त्याला दवाखान्यात नेण्यासाठी पाच हजार रुपये दे, असे म्हणाला. त्यावेळी चालक व सुभाष खरात यांनी लक्झरीने कोणालाही कट मारला नाही, असे म्हटले असता त्यांना आरोपींनी चापटबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. तसेच पेट्रोल टाकून लक्झरी पेटवून देण्याची धमकी दिली. ही सर्व घटना लक्झरीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...