आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव:खामगाव येथे साकारल्या तीन स्मार्ट अंगणवाड्या

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभमुहूर्तावर खामगाव प्रकल्पातील तीन अंगणवाडी केंद्रांचे नूतनीकरण व शुभारंभ सोहळा २ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. त्यामध्ये तालुक्यातील घाटपुरी, सुटाळा बुद्रुक व वाडी येथील अंगणवाडी केंद्रांचे नूतनीकरण रंगरंगोटी व बांधकाम हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने सीएसआर निधीतून केले. तसेच प्रभात उपक्रमा अंतर्गत तीन अंगणवाडी केंद्रांचे नूतनीकरण बांधकाम व रंगरंगोटी पूर्ण केली आहे.

त्याचा शुभारंभ सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बुधवारी पार पडला. कार्यक्रमाला कंपनी डायरेक्टर विद्या गोविंदराजन, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अतुल पाटोळे, गट विकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, बालविकास प्रकल्प अधिकारी राजेश वाघ, घाटपुरीच्या सरपंच संगीता गोपाल ढोले व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...