आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकावर किडीचा प्रादुर्भाव:सोयाबीन पिकावरील हुमनी अळीचे वेळीच नियंत्रण करावे

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसात पावसाचा खंड पडल्यामुळे बऱ्याच शेतातील सोयाबीन पिकावर हुमनी अळी आढळून आली आहे. त्यामुळे या अळीचे वेळीच नियंत्रण करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा व चिखली तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने चिखली तालुक्यातील अमोना, मेरा बुद्रुक, मलगी येथे सोयाबीन पिकात पावसाच्या मोठ्या खंडानंतर कमी अधिक प्रमाणात हुमनी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पावसाचा खंड पडल्याने बऱ्याच शेतांत ही अळी आढळून आली आहे. या किडीची अळी जमिनीत राहून पिकांच्या मुळांवर हल्ला करून उपजीविका करते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत हुमनी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ पी. पी. देशपांडे यांनी केले आहे. या अळीचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी मेटारायझियम ॲनिसोपली या जैविक बुरशीचा वापर दहा किलो प्रती हेक्टर या प्रमाणात जमिनीतून द्यावे. तसेच मेटारायझियम ॲनिसोपली या जैविक बुरशीची चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव ग्रस्त भागात फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...