आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अवैध वाळू वाहतूक करणारे टिपर पकडले ; माफियांचे धाबे दणाणले

बुलडाणा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रातून रेती उपसा करून वाहतूक करणारे भगवान महादू जेढे यांच्या विना क्रमांकाचे टिपर महसूल विभागाने जप्त केले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी सोमवारी देऊळगाव मही परिसरात केली. खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांची टोळी सक्रिय झाली आहे. वाळू माफियाकडून चिखली, बुलडाणा, खामगाव तसेच मराठवाड्यातील जालनापर्यंत चोरट्या वाळूचा पुरवठा करण्यात येतो. रात्रीच्या अंधारात वाळू उपसा करायचा आणि सूर्योदयापूर्वी विना नंबर असलेल्या टिप्परमधून त्याचा पुरवठा करायचा हे नित्याचेच बनले आहे. अवैध वाळूवर पायबंद घालण्यासाठी तालुकास्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु त्या समितीतही काही वाळू माफिया असल्याने अवैध वाळूची वाहतूक सुरूच आहे. याला आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे माफियांचे धाबे दणाणले आहे.

बातम्या आणखी आहेत...