आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोक म्हणतात की माणसाने चंदनासारखे झिजावे आणि मेणबत्ती प्रमाणे जळावे. चंदनाचा सुवास दरवळतो अन् मेणबत्ती छोटी असली तरी प्रकाश देऊन मार्ग दाखवते. ही म्हण चंदनाने झिजावे अन् मेणबत्तीने जळावे हे माता रमाईंकडून शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन मंजूश्री खोब्रागडे यांनी व्यक्त केले. या वेळी डॉ.कृत्तिका अक्षय हिरे यांनीही माता रमाईच्या त्यागामुळेच आपण आज रुग्णसेवेत राहुन जनसेवा करत असल्याचे सांगत महिलांना आरोग्य जोपासण्याचा सल्ला दिला रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त समाज कल्याणच्या सांस्कृतिक भवनात आज रविवार, ५ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अस्मिता मनवर, प्रा.प्रतिभा शिरभाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
रमाईंबद्दल या मान्यवर महिलांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षस्थानावरून मंजूश्री खोब्रागडे या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, प्रत्येक महापुरुषांच्या पाठीमागे ही एका स्त्रीचा त्याग असतो. बाबासाहेबांना ज्ञानसूर्य बनवण्यासाठी रमाईंचा मोलाचा वाटा आहे. क्रांतीच्या रथावर बाबासाहेब आरुढ झाले ते माता रमाईंच्या सहकारामुळे व त्यागामुळे. माता रमाईंमध्ये असे अभूतपूर्व गुण होते ज्यामुळे त्या कोट्यवधी जनतेच्या आई झाल्या.
स्त्रीयांनी आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. कृत्तिका हिरे आज सुदैवाने त्यांच्या त्यागातूनच आपण या समाजात वावरतो आहोत. घरातील स्त्री आजारी पडली म्हणजे सर्व घरच आजारी पडते. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आज आपण जे आहे ते रमाईंमुळे आहोत. या बुलडाणेकरांनीही आपले सासरे डॉ.पंजाबराव हिरे यांना सामावून घेतले. तसे आपल्यालाही सामावून घ्यावे, असे मत डॉ.कृत्तिका अक्षय हिरे यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.