आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:‘कृषक भारती को. ऑपरेटिव्ह लिमिटेड’चे आयोजन; सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगाम-२०२२ पूर्व जिल्हा विक्रेता परिषदेचे आयोजन मलकापूर येथे ‘कृषक भारती को. ऑपरेटिव्ह लिमिटेड’तर्फे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी बुलडाणा यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.

यावेळी परिषदेस कृभको चे मुख्य राज्य विपणन प्रबंधक विवेक मोहरीरप्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर मलकापूर तालुका कृषी अधिकारी एन. के. राऊत, कृभको चे विभागीय व्यवस्थापक बिपिन चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर सचिव अजय जाधव, आर. जी. बी. तुषार कोचर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

दरम्यान बिपिन चव्हाण यांनी तांत्रिक तास घेऊन शेतकऱ्यांना योग्य दर्जाची खते द्यावीत व सेंद्रिय खतांचा वापर करावा असे सांगितले.तालुका कृषी अधिकारी राऊत यांनी सेंद्रीय खते आणि संतुलित खतांचा वापर करावा असे आवाहन केले. कृभको चे मुख्य राज्य विपणन प्रबंधक विवेक मोहरीर यांनी परिषदेस संबोधित करताना जिल्हा, राज्य, देश आणि विदेश पातळी वरील खतांचा आढावा सांगितला.

तसेच मागील वर्षाच्या तुलनेत कृभको नि एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्र राज्यास खतांचा जास्तीचा पुरवठा केला असे सांगितले.जिल्हा कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगाम नियोजनाचे धडे दिले तसेच शेतकऱ्यांना योग्य वेळेत आणि दर्जेदार खते उपलब्ध करून देण्यास कृषी विभाग आणि कृभको नेहमीच तत्पर असतात. यावेळी एप्रिल आणि मे महिन्यांमधे बुलडाणा जिल्ह्यास युरिया आणि कॉम्प्लेक्स खतांचा योग्य आणि चांगला पुरवठा झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी विक्रेत्यांना खत विक्री करताना पी.ओ.एस. मशीनच्या साह्याने करावी असे आदेश देण्यात आले व सेंद्रिखतांचा वापर वाढवावा असे सांगितले आणि कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक ठिकाणी नेमणूक केले असल्याचे सांगितले आहे.या परिषदेस जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील घाऊक तसेच किरकोळ विक्रेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘कृभको’चे बुलडाणा जिल्हा क्षेत्रीय अधिकारी संदीप ढाकणे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...