आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:‘समूह राष्ट्रगीत गायनाच्या उपक्रमात सहभागी व्हावे’ ; जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांचे आवाहन

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम बुधवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी जिजामाता प्रेक्षागार येथे उपस्थित राहावे, तर नागरिकांनी यावेळी ते ज्याठिकाणी असतील तेथेच उभे राहून राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.

या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच समुह राष्ट्रगीत गायनाच्या बुधवारी सकाळी ११ वाजता नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करावे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, केंद्र शासन आणि राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, नगरपालिका, ग्रामपंचायत, सहकारी संस्था आदींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, तसेच समुह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेऊन समुह राष्ट्रगीत गायन उपक्रमास यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...